महत्वाच्या बातम्या

 भद्रावती येथे धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम विभागाच्या अंतर्गत भद्रावती शहर शाखाच्या वतीने पंचशील नगर, चांडीका वार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन भद्रावती या येथे ३० जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

३० जुलै २०२३ रविवारला या शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा चे सरचिटणीस ॲड. जगदीप खोब्रागडे यांनी केले तर प्रमुख उपस्थिती संदीप सोनोणे जिल्हा उपाध्यक्ष, शिबिराचे प्रमुख मिली वाघ अध्यक्ष भद्रावती शहर शाखा अध्यक्ष प्रगती ताई मेश्राम, केंद्रीय शिक्षिका कविता अलोने, कविता चांदेकर केंद्रीय शिक्षिका, कांता मुन केंद्रीय शिक्षिका उपस्थित होते. 

शिबिराला धम्मउपसिकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक सुजाता लाटकर केंद्रीय शिक्षिका तथा जिल्हा उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा या दहा दिवस विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा भद्रावती शहरातील धम्म उपासक उपासिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. जयदीप खोब्रागडे यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos