महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाचे आयोजन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून धारीवाल लिमिटेड कंपनीच्या समाजिक दायित्व विभाग अंतर्गत पहेल मल्टीपर्पज सोसायटी द्वारा कार्यक्षेत्रातील मोरवा, ताडाळी, सोनेगाव, शेनगाव, पांढरंकवाडा, वढा, चारगाव येथील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त व्हावे, शहरी मुलांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी आत्यावश्यक शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन महिने एम.एस. ऑफिस संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

प्रशिक्षणाचे उदघाट्न धारिवाल कंपनीचे महाप्रबंधक देवेश कुमार यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती म्हणून व्यवस्थापक निलेश गोखरे, सहाय्यक व्यवस्थापक धीरज ताटेवार, संगणक केंद्राचे संचालक पारखी उपस्थित होते.

महाप्रबंधक  देवेश कुमार म्हणाले की, ग्रामीण भागातील जे विद्यार्थी संगणक शिकण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे मागे पडलेले आहे. अशा विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण माध्यमातून् शिकण्याची संधी प्राप्त होईल व हे आत्यावश्यक काम तुमच्या सर्वांच्या कार्य कुशलतेने पार पडेल याचा आम्हाला अभिमान असेल, नियमित क्लास  ला उपस्थित राहून ज्ञान अवगत करावे असे प्रतिपादन केले.

यावेळी प्रशिक्षणार्थी व पहेल संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos