गडचिरोली पोलिस दलातील १०२ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहिर


- ४ अपर पोलिस अधीक्षक, ३ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १६ पोलिस उपनिरीक्षक आणि ७९ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्यात उल्लेखनिय व विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येते. यावर्षी राज्यातील एकूण ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहिर करण्यात आले असून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलदृष्ट्या , अतिसंवेदनशिल व दुर्गम भागातील सेवेबद्दल १०२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहिर झाले आहे.
सन्मानचिन्ह जाहिर झालेल्यांमध्ये ४ अपर पोलिस अधीक्षक, ३  सहाय्यक पोलिस निरीक्षक , १६ पोलिस उपनिरीक्षक आणि ७९ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक व सध्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक व सध्या उस्मानाबाद येथे कार्यरत पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) डाॅ. हरी बालाजी यांचा समावेश आहे. या सर्व पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे.
१०२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलिस महासंचालक सन्मनचिन्हाने गौरव होणे ही बाब गडचिरोली पोलिस दलासाठी गौरवास्पद आहे. पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पालिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-23


Related Photos