महत्वाच्या बातम्या

 आष्टी येथे महसूल सप्ताहानिमित्य विविध कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : तहसिल कार्यालय आष्टीच्यावतीने महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहानिमित्य महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. ७ ऑगस्ट पर्यंत सप्ताह सुरु राहणार असून या दरम्यान विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे.

सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी तहसिल कार्यालयाच्यावतीने युवा संवाद कार्यक्रम घेण्यात आला. या दरम्यान आष्टी तालुक्यातील दोन अनाथ लाभार्थ्यांच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रकरणे मंजुरीची कारवाई करण्यात आली. साहुर येथील आठव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी कृष्णा संजयराव कर्डीकर, लोकमान्य विद्यालय आष्टी येथील अकरावीची विद्यार्थीनी खुशी राजेश शर्मा यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले.

सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची प्रकरणे ऑनलाइन स्वीकारून ती समिती समोर ठेवण्यासाठी सर्व कागदपत्रांसह तयार करण्यात आले. या महिन्यात होणाऱ्या मासिक सभेत दोघांची प्रकरणे मंजूर करून त्यानंतर याच महिन्यापासून या विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार ५०० इतका लाभ सुरू करण्यात येणार आहे. सप्ताहानिमित्त आष्टी येथील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले व कागदपत्रांची माहिती देण्यात आली. 

महसूल दिनानिमित्त कलम १५५ अंतर्गत आदेश पारित करून नागरिक आणि शेतकरी यांना सदर आदेशाचे आणि त्यानुसार सुधारित सातबाराचे वितरण देखील करण्यात आले. सदर वितरण उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट आणि तहसीलदार सचिन कुमावत यांचे उपस्थित करण्यात आले.





  Print






News - Wardha




Related Photos