व्हीव्हीपॅट मशीनमध्ये शिरला साप, मतदान केंद्रावर गोंधळ


वृत्तसंस्था / कन्नूर : केरळ राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात सुरु असलेल्या मतदानादरम्यान  कन्नूर येथील कंदक्कई  मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये साप घुसल्याने मतदान केंद्रावर काही काळ  गोंधळ उडाला. त्यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान थांबवण्यात आलं होतं. 
कन्नूर लोकसभा मतदारसंघातील मय्यिकल कंदक्कई मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. याचवेळी मतदान सुरू असताना एक छोटा साप व्हीव्हीपॅट मशीनमध्ये घुसला. त्यामुळे मतदारांमध्ये एकच घबराट पसरली. या प्रकाराने अधिकारीही गोंधळले आणि त्यांनी मतदान थांबवलं. मतदानासाठी आलेल्या काही लोकांनीच व्हीव्हीपॅट मशीनमधून हा साप बाहेर काढला. त्यानंतर पुन्हा मतदानास सुरुवात झाली.    Print


News - World | Posted : 2019-04-23


Related Photos