महत्वाच्या बातम्या

 रत्नापुर येथील वृद्धाची विहीरीत उडी घेवून आत्महत्या


- सिंदेवाही तालुक्यातील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : रत्नापूर येथील कृषि उत्पन बाजार समितीचे सेवानिवृत कर्मचारी रामकृष्ण  गेडाम (६८) यांनी बुधवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास गावाजवळील शेतशिवारातील सार्वजनिक विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. 

रामकृष्ण गेडाम हे व्याधीग्रस्त असल्याने टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविल्याचे बोलले जात आहे. रत्नापुर येथील पोलीस पाटील गहाणे यांनी पोलीस विभागाला माहीती दिली. आणि पोलिसानी घटनास्थळी दाखल होवून मृतदेह विहीरीतून बाहेर काढला व पंचनामा केला.

माहितीनुसार त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंड असा बराचमोठा आप्तपरीवार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos