महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर : ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात ९ सप्टेंबर २०२३ रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालातीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकेबद्दलची प्रकरणे, आपसात तडजोड करण्याजोगे प्रकरणे व इतर फौजदारी प्रकरणे, वैवाहिक आणि इतर वाद अशी दाखलपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, महसूल प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकूमाचे दावे, विशिष्ट पूर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद आदी प्रकरणे ठेवता येणार आहे. 

अशा प्रकारची प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालती मध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता संबंधित न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर कार्यालयाशी संपर्क साधावा व लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos