मोहाडी तहसील कार्यालयातील दोन कनिष्ठ लिपीकांना लाच घेतांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
रेती भरण्यासाठी आणलेली जेसीबी नायब तहसीलदारांनी पकडल्यानंतर नायब तहसीलदारांसाठी दोन लाखांची लाच स्वीकारताना मोहाडी तहसील कार्यालयातील दोन कनिष्ठ लिपीकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. एकनाथ दत्तात्रय कातकाडे (३२)  आणि देविदास तुळशिराम धुळे  (३०) अशी लाचखोर कनिष्ठ लिपीकांची नावे आहेत. 
तक्रारदाराने २८ फेब्रुवारी रोजी जेसीबी मशिन क्रमांक  एम. एच. ४० / बि. एफ. ३२९९ ही बेटाळा येथिल नदी काठावरील जमा असलेला रेती साठा भरून देवुन उत्पन्न मिळविण्याचे हेतुने भाडे तत्वावर आणली होती. २ मार्च रोजी नायब तहसीलदार नवनाथ कातकडे   यांनी तक्रारदाराने किरायाने आणलेली जेसीबी मशिन बेटाळा येथिल शेत शिवारात पकडली व मोहाडी पोलिस ठाण्यात चौकशी कामी लावली.  नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्याकरीता  कनिष्ठ लिपीक एकनाथ दत्तात्रय कातकाडे आणि देविदास तुळशिराम धुळे  यांनी तक्रारदारास २ लाख रुपये लाचेची मागणी केली. कनिष्ठ लिपीक एकनाथ कातकडे व देविदास धुळे यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची तक्रारदाराची  ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा तर्फे सापळा कार्यवाही आयोजीत केली असता सापळा कारवाई दरम्यान एकनाथ दत्तात्रय कातकाडे  व देविदास तुळशीराम  धुळे यांनी तक्रारदार यांची चौकशी करीता पो.स्टे. मोहाडी येथे जमा करण्यात आलेली जेसीबी मशिन सोडून देण्याकरीता आणि कोणत्याही प्रकारची कायदेशिर कार्यवाही न करण्याकरीता नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्याकरीता २ लाख  रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दोन्ही आरोपींविरूध्द मोहाडी पोलिस ठाण्यात  कलम ७,(अ) लाचलुचपत प्रतिबंध १९८८ (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कार्यवाही  पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक  श्रीकांत धिवरे (अतिरिक्त कार्यभार) , अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, यांच्या मार्गदर्शनात   पोलीस उप अधिक्षक  महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी,  प्रतापराव भोसले, नापोशि अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, शेखर देशकर , कोमलचंद बनकर, कुणाल कडव, दिनेश धार्मिक यांनी केली आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-04-23


Related Photos