राज्यातील २८५ फुलपाखरांचे होणार मराठी नामकरण, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने जाहीर केली संभाव्य यादी


वृत्तसंस्था /  मुंबई :  राज्यातील २८५ फुलपाखरांना मराठीमध्ये नाव देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने  संभाव्य यादी नुकतीच जाहीर केली. निसर्गप्रेमी, जैवविविधता अभ्यासक, तज्ज्ञ, नागरिकांकडून फुलपाखरांच्या मराठी नावांवर मते, सूचना पाठविण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील फुलपाखरांना सोपी व लक्षात ठेवता येतील अशी मराठीतून नावे असावीत, यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने फुलपाखरांना नावे ठरविण्यास एक समिती स्थापन केली आहे. या समितीने राज्यात आढळणाऱ्या फुलपाखरांची नावे ठरविण्यासाठी अटी, नियमावली तयार केली आहे.
महाराष्ट्रात २८५ प्रजातींचे फुलपाखरे आढळतात. फुलपाखरांना ओळखण्यासाठी लॅटिन भाषेत शास्त्रीय नावे किंवा इंग्रजीत नावे आहेत. देशात फुलपाखरांचा अभ्यास ब्रिटिशांच्या काळात झाल्याने फुलपाखरांना ब्रिटीश अधिकाऱ्यांनी नावे दिली होती. सामान्यत: नावे ही त्यांचे रंग, रूप, आकार, अंगावरील ठिपके, सवय, वागणूक, सहवास किंवा शोधकर्त्यावरून देण्यात आली. परंतु, महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठीतून नावे असावीत, यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने समिती स्थापन केली आहे. या समितीने राज्यात आढळणाऱ्या फुलपाखरांची नावे ठरविण्यासाठी अटी, नियमावली तयार केली आहे. त्यानुसार अभ्यासक, निसर्गप्रेमी आदींना विविध माध्यमांद्वारे नावे पाठवून त्यावर सर्वांची मते, सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. 

 



  Print






News - Rajy | Posted : 2019-04-23






Related Photos