महत्वाच्या बातम्या

 निसर्गात स्वच्छता राखून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे गरजेचे : उपसरपंच अनिल कुनघाडकर


- कुनघाडा (रै.) जि.प. केंद्र व कन्या शाळेत निसर्ग पूजा व वृक्षारोपण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : निसर्गाच्या सानिध्यात राहूनच माणसाचा जन्म झाला असून, निसर्ग हा माणसाचा प्राण आहे सोबती आहे. माणसाच्या माणसाचे आरोग्य सुदृढ ठेऊन आयुष्याची घडी सुरक्षित ठेवण्यासाठी निसर्गात स्वच्छता राखून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे गरजेचे आहे. तसेच दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड भरून काढण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे असे प्रतिपादन उपसरपंच अनिल कुनघाडकर यांनी केले. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून १ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद केंद्र व कन्या शाळा कुनघाडा  (रै.) येथे निसर्ग पूजा व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सरपंचा अल्का धोडरे या होत्या, अध्यक्षस्थानी उपसरपंच अनिल कुनघाडकर हे होते. निसर्ग पूजा केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच अविनाश चलाख, सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष तथा से. नि. केंद्रप्रमुख अशोक वडेट्टीवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊजी पाटील कुकडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप दुधे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई शृंगारपवार, ग्रामपंचायत सदस्या दिपाली बोदलकर, नवरगावचे सरपंच खुशाल कुकडे, केंद्र मुख्याध्यापिका कु गीता शेंडे, कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुकलाल गोटामी, क्षेत्र सहाय्यक एच.जी. झोडगे, वनरक्षक ए.एम. टेकाम, वनरक्षक कौशल्या मडावी, पदवीधर शिक्षक अनिल दुर्गे, विषय शिक्षक प्रमोद बोरसरे, विषय शिक्षिका वर्षा गौरकर, पुंडलिक भांडेकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेच्या पटांगणात मान्यवरांच्या हस्ते झाडाचे विधिवत पूजन करून निसर्गाची पूजा करण्यात आली तसेच आवळा, जांभूळ, मोह आदी विविध प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुंडलिक भांडेकर यांनी केले, संचालन प्रमोद बोरसरे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार अनिल दुर्गे, वर्षा गौरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन पुंडलिक भांडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी काशिनाथ कुनघाडकर, संतोष गव्हारे, नामदेव वासेकर, दिलखुश कुनघाडकर, विश्वनाथ गव्हारे, उमेश गझलपेल्लीवार, गजानन कोडाप, स्वप्निल कुकडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos