महत्वाच्या बातम्या

 नालंदा क्रिडा मंडळ कराटे कल्ब विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत मध्ये निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील कराटे पटुंचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत निवड़ झाली आहे.
       

नुकत्याच झालेल्या अमृतसर पंजाब येथील खालसा महाविद्यालयत अखिल भारतीय कराटे स्पर्धेत  जिंकून ते आता कर्नाटक शिवमोगा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भाग घेणार आहेत. त्या मध्ये शहरातील दिलासाग्राम कॉन्व्हेन्ट चे विद्यार्थी यश भैयालाल कोरे, भास्कर संजय गुघलोत, गुरुनानक पब्लिक स्कूल चा विद्यार्थी साईप्रनित स्वामी डोडापल्लीवार व प्रशिक्षक सुनिल विजय कांबळे हे भाग घेणार आहेत. या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत एकूण १४ देशाचे स्पर्धक भाग घेणार आहेत. 

त्यांना पुढील स्पर्धेत यश संपादन करण्याकरिता नालंदा क्रिडा मंडळ व शहरी विकास केंद्र बल्लारपूर उपक्रम  संस्कार व्यायाम शाळा चे अध्यक्ष समीर केने, मनीष पांडे, दिलासाग्राम कॉन्व्हेन्ट च्या मुख्याध्यापिका सिस्टर विणया, उपमुख्याध्यापिका सिस्टर फुल कुमारी व विद्यार्थी चे आई वडिल व कराटे प्रशिक्षक  सुनिल विजय कांबळे यांनी शुभेच्या दिल्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos