महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे : कृषी अधीक्षक कार्यालयाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : कृषी विभागामार्फत पिक स्पर्धा राबविण्यात येत आहे.त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने केले आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी रागी, तुर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२३ आहे. तसेच स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम ३ हजार रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील.

ऑगस्ट राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागामध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. व उत्पादकेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याचा एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेऊन राज्यातंर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधरण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी रागी, तुर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या ११ पिकासाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.तसेच पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वत:च्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकांची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर १ एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य,जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे - १), विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र-अ २) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलान ३) ७/१२, ८-अ चा उतारा ४) जात प्रमाणपत्र केवळ आदिवासी असल्यास ५) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेला नकाशा ६) बॅक खाते चेक/पासबुकाच्या पहिल्या पानाची छायाचित्र प्रत सोबत जोडावी. 

पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरुप - सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथत, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढील प्रमाणे सादर करण्यात येत आहे.

स्पर्धापातळी व सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये १) तालुकापातळीवर  पहिले बक्षिस ५ हजार रुपये, दुसरे बक्षिस ३ हजार रुपये, तिसरे बक्षिस २ हजार रुपये, तसेच जिल्हापातळी वर पहिले बक्षिस १० हजार रुपये,व दुसरे बक्षिस ७ सात हजार रुपये,तिसरे बक्षिस ५ हजार रुपये,तसेच राज्यपातळीवरील पहिले बक्षिस ५० हजार रुपये,दुसरे बक्षिस ४० हजार रुपये,तिसरे बक्षिस ३० हजार रुपये ठेवण्यात आली आहे.त्याप्रमाणे खरीप हंगाम सन २०२३ पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,श्रीमती.संगीता माने यांनी केले आहे. तसेच या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट राज्य, संकेतस्थळ- www.krishi.maharashtra.gov.in  किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे संबंधित विभागानी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos