महिलेची छेडखाणी करणाऱ्या आरोपीस पाच वर्षांचा सश्रम कारावास


- सहा हजार द्रव्यदंडाची शिक्षा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: महिला एकटीच घरी असताना घरात प्रवेश करून महिलेची छेडखाणी करणाऱ्या  आरोपीस गडचिरोली येथील मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि सहा हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. 
राजेंद्र लालाजी किणेकार (३६) रा. खुर्सा पो. मुरमाडी ता.जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. आरोपी राजेंद्र किनेकान याने फिर्यादी महिलेच्या घरात प्रवेश करून तू आठ दिवसांपूर्वी माझा अपमान केला असे म्हणत महिलेचा हात पकडला. महिलेच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात २३ ऑगस्ट २०१८ रोजी कलम ३५४ (अ), ४४८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी केला. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने आज २२ एप्रिल रोजी सबळ पुराव्याच्या आधारे आरोपीस शिक्षा ठोठावली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-22


Related Photos