महत्वाच्या बातम्या

 कसनसुर येथे एक गाव एक वाचनालय उपक्रमाचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : पोलीस अधीक्षक  निलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलिस अधिक्षक  यतिश देशमुख यांच्या संकल्पनेतून व सुदर्शन राठोड उपविभागीय पोलिस अधिकारी एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस स्टेशन कसनसुर अधिकारी व अंमलदार यांच्या श्रमदानातून  कसनसुर गावामध्ये सुसज्य व प्रशस्त असे सार्वजनिक वाचनालय तयार करण्यात येऊन २५ जुलै रोजी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कसनसुरच्या सरपंचा कमल हेडो या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तेलतुंबडे, कसनसुरचे पोलिस पाटील रायजी मडावी, सहकारी बँकेचे व्यवस्थापक सोनवणे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम कसनसुर गावातुन ग्रंथदिंडी काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर  क्रांती सुर्य बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयाचे उद्घघाटन करण्यात आले.

प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अख्तर सय्यद यांनी उपस्थित नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन वाचनालयाचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पो.उप.नि. सुशिल सरनायक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिकारी कर्मचारी, एसआरपीएफ अधिकारी अमलदार यांनी परीश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos