पालकमंत्री ना. आत्राम यांची अतिदुर्गम व्यंकटापूर येथील ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 
राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे  पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील अति मागास अशा ग्राम पंचायत व्यंकटापूर येथे कुठलेही पूर्व नियोजन न करता धडक भेट देऊन ग्रामस्थांशी सु-संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
 निवडणूक प्रचाराचे देशभर धडाक्यात काम चालू असतांनाही आपल्या क्षेत्रातील सामान्य जनमाणसाची भेट घेण्यासाठी  ना. राजे आत्राम यांनी काही दुर्गम भागातील परिस्थिती विषयी जाणून घेण्यासाठी अचानक दौऱ्यांचे आयोजन केले.  आपल्या व्यस्त प्रचार दौऱ्यांमधून वेळ काढत सम्पूर्ण दिवसभर ना. आत्राम यांनी अहेरी क्षेत्रातील काही दुर्गम भागांचा  प्रवास केला व तेथील ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या.   त्यावर नागरिकांशी चर्चा  करत उत्तरादाखल काही सूचनाही केल्या.
पालकमंत्री ना. आत्राम यावेळी म्हणाले, व्यंकटापूर हे राज्याच्या सीमेवर असलेले  अतिशय दुर्गम गाव आहे. मागील ७० वर्षाच्या राजकीय दुर्लक्षामुळे येथील विकास झालेला नाही. पण मागील ४ वर्षाच्या कारकिर्दीत वेंकटापूर येथील विकासासाठी मी प्राथमिक लक्ष पुरवून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे.  इथून पुढेही गावांच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची शास्वती देतो. गावाच्या विकासात सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे रस्ता. त्यासाठी आपण अतिरिक्त निधी उपलब्ध करून देत सतत पाठपुरावा केल्यामुळे व्यंकटापूर ते वट्रा रस्ता बांधकाम सुरू झालेला  आहे जे काही दिवसांतच पूर्णत्वास येईल. त्यानंतर वेंकटापूर आणि वट्रा येथे बस सेवाही काही दिवसांतच सुरू करणार आहोत. ज्यामुळे गावाच्या विकासाला अधिक गती मिळेल.
पालकमंत्री ना. आत्राम पुढे म्हणाले, येथील हनुमान मंदिराच्या बांधकाम व सुशोभीकरणासाठी जिल्हा पर्यटन विभागाच्या अंतर्गत ९५ लाख रुपयांचा निधीही मी स्वतः पुढाकार घेऊन उपलब्ध करून दिलेला आहे. गावाच्या विकासासाठी लागेल ती गोष्ट तसेच लागेल तेवढा निधी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी या नात्याने बाध्य आहे.  तुम्हाला गावाच्या विकासासाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवत असल्यास सरळ माझ्याकडे या गावाच्या प्रत्येक समस्येचे समाधान माझ्याकडून होईल याची शास्वती देतो, असे सूतोवाच करत ना. आत्राम यांनी   उपस्थित सज्जन ग्रामस्थांशी संवाद साधला.  त्यांच्या समस्या समजून घेतल्या व त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. 
यावेळी व्यंकय्या परचीवार, अय्यगरु, सरपंच व्यंकन्न कोडापे, कांबळे  , रवींद्र परकिवार, बंडू मुरमाडे आदी  सह व्यंकटापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-22


Related Photos