महत्वाच्या बातम्या

 ६२ वर्षीय बस चालकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग


- पालकामध्ये भीतीचे वातावरण 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील एका कॉन्व्हेन्ट मध्ये शिकत असलेल्या ९ वर्षीय विद्यार्थिनीचा त्याच शाळेतील ६२ वर्षीय बस चालकाने विनयभंग केला. विद्यार्थ्याच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३५४ आणि पॉस्को ८,१२ नुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. मो. अजीज मो. मजहर शेख असे आरोपीचे नाव असून तो पंडित दीनदयाळ वार्डातील रहिवासी आहे.

सोमवारी सकाळी कॉन्व्हेन्ट मधील बसचालक मोहम्मद अजीज याने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने सर्व प्रकार आईला सांगितला. त्यांनी बल्लारपूर पोलिसांत येऊन बसचालकाविरुद्ध फिर्याद दिली असता, गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

पुढील तपास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नेहा सोळंकी करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos