महत्वाच्या बातम्या

 कुनघाडा (रै.), तळोधी (मो.) व नवेगाव (रै.) परिसरातील पाणी पुरवठा बंद


- नागरिकांचा चक्काजाम आंदोलनाचा ईशारा

- आमदार डॉ. देवराव होळी यांना दिले समस्यांचे निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : कुनघाडा (रै.), तळोधी (मो.), नवेगाव (रै.) या ग्रामपंचायत अंतर्गत कुनघाडा (रै.), बाजारपेठ, ईरई, गोवर्धन, उमरेड, तांबाशी, तळोधी (मो.), रामपुरी, नवेगाव (रै.), सुभाषनगर या १० गावांचा समावेश असून येथील लोकसंख्या अंदाजे २० हजार एवढी आहे सदर योजना ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग गडचिरोली जि.प. गडचिरोली या यंत्रनेमार्फत चालविण्यात येते सदर योजनेचे देखभाल दुरुस्ती तसेच पाणी वितरण करणाऱ्या कंत्राटदाराच्या कंत्राटाच्या करारनाम्याची मुदत संपल्याने सदर योजना ११ जुलै २०२३ पासून अजूनही बंद आहे. 

त्यामुळे सदर ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झालेली असून पाण्याकरिता पायपीट करावी लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून कुनघाडा (रै.) पाणी पुरवठा नळयोजनेअंतर्गत पाणी पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात यावा अन्यथा पाणी पुरवठा सुरु न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ सी कुनघाडा (रै.) येथील बस थांब्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा ईशारा ग्रामस्थांनी आमदार डॉ. देवराव होळी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos