महत्वाच्या बातम्या

 एमपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका संदर्भात महाज्योती कडून चौकशी सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : ३० जुलै २०२३ रोजी महाज्योतीच्या एमपीएससी प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यावर प्रश्नपत्रिकेत काही विशिष्ट प्रशिक्षण संस्थांच्या पुस्तकातील प्रश्न विचारल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयाकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्राप्त तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

चौकशी अहवाल प्राप्त होताच त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी अपप्रचाराला बळी पडू नये तसेच मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम राहण्याची महाज्योतीची भूमिका असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर यांनी कळविले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos