लोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला , २३ ला मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज २१ एप्रिल रोजी थांबला असून मंगळवार २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात १५ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणूक २०१९ साठी देशात ९ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यांपैकी राज्यात चार टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेनुसार, मतदानापूर्वी ४८ तास आधी प्रचार थांबतो. त्यानुसार, तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला, या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील एकूण १५ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
तिसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मंगळवारी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
News - Rajy | Posted : 2019-04-21