महत्वाच्या बातम्या

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित फुले - आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे आज १ ऑगस्ट २०२३ ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून व माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्र. प्राचार्य डॉ. खंगार, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. वनमाली, प्रा. डॉ. गोर्लावार (व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य) प्रा. डॉ. गौर (सिनेट सदस्य) हे उपस्थित होते.
या निमित्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. यादवराव गहाने (सांस्कृतिक विभाग प्रमुख) यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. कविता उईके ( सांस्कृतिक विभाग सहप्रमुख) यांनी केले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रा. डॉ. लाकडे, डॉ. बारसागडे, प्रा. निंबाळकर, प्रा. डॉ. कुडे, प्रा. बुटले, प्रा. कंती, प्रा. चरडे, डॉ. वर्षा तीडके, देशमुख, चाहांदे, केदार व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos