श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर भारतातही हाय अलर्ट , १५६ ठार, ४०० हून अधिक जखमी


वृत्तसंस्था / कोलंबो : आज ईस्टर संडे साजरा होत असताना   श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले.  प्राप्त माहितीनुसार  आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाला असून, ४०० जण जखमी झाले आहेत. यात ३५ विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे. या स्फोटानंतर भारतातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.   
   बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोलंबोतील दोन फाइव्ह स्टार हॉटेलांतही बॉम्बस्फोट झाले. एका वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार, कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. आतापर्यंत ४०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. 
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असं त्या म्हणाल्या.   Print


News - World | Posted : 2019-04-21


Related Photos