रामाळा येथे पाणी समस्या गंभीर मात्र सौर ऊर्जेवरील दुहेरी पंप नळयोजना बंद


- नगर परिषदेचे दूर्लक्ष, नागरीकांची भटकंती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मिथून धोडरे / आरमोरी
: स्थानिक नगर परिषदेत समाविष्ट असलेल्या रामाळा गावात पाणी समस्या गंभीर झाली आहे. यामुळे नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून रामाळा येथे नगर पंचायत अस्तित्वात असताना २०१७ - १८ मध्ये कार्यान्वित करण्यात आलेली सौर ऊर्जेवरील दुहेरी पंप नळ योजना बंद पडली आहे. यामुळे नगर परिषदेने लक्ष देवून पाणी समस्या सोडविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
रामाळा येथे आरमोरी नगर पंचायत असताना नागरी दलितेत्त वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१७ - १८ मध्ये सौर ऊर्जेवरील दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजना निर्माण करण्यात आली. या योजनेसाठी अंदाजे ४ लाख ९८ हजार ८२४ रूपये इतका खर्च करण्यात आला. मात्र सध्या स्थितीत ही पंप नळ योजना बंद पडली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे आता नागरीकांना भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आरमोरी नगर पंचायतीचे आता नगर परिषदेत रूपांतर झाले आहे. पहिली निवडणूक सुध्दा पार पडली. यामुळे नगर परिषदेने रामाळा येथील पाणीटंचाईकडे लक्ष केंद्रीत करून नळयोजना कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-21


Related Photos