महत्वाच्या बातम्या

 वाघोली बुटी येथील उच्च शिक्षित सरपंच पायउतार 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथील सरपंच यमु मेश्राम यांना ३१ जुलै रोजी पायउतार होण्याची वेळ आली .
सावली तालुक्यातील वाघोली बुटी हे शेवटच्या टोकावर असलेले गाव असून या गावात ७ ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतचे सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा समर्थित ४ तर काँग्रेस समर्थित ३ सदस्य निवडून आले होते.

त्यावेळेस सरपंच पद हे अनुसूचित जाती साठी राखीव असल्यामुळे येथील उच्च शिक्षित असलेली भाजपा समर्थित कु. यमू मेश्राम या सरपंच पदावर विराजमान झाले होते.
कालांतराने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे येथील सह ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत सभेला हजर नसणे, गावामध्ये हजर नसणे, ग्रा. पं. सदस्यांसोबत व जनतेशी  उद्धटपणाने वागणे, अंगणवाडी पोषण आहाराचे चेक वर सह्या न मारणे, रोजगार सेवकांची निवड झाली असताना सुद्धा त्यावर सह्या न करणे असे कारणे सरपंच यांच्या यांच्या विरोधात टाकून तशी तक्रार २५ जुलै रोजी सावली तहसीलदार यांच्याकडे टाकण्यात आले होते.

त्या संबंधाने ३१ जुलै रोजी सावली चे तहसीलदार पाटील यांनी वाघोली बुटी येथे विशेष सभेचे आयोजन केले होते. या विशेष सभेत सरपंच यांच्या विरोधात १ विरुद्ध ६ मताने पारित झाल्यामुळे येथील सरपंच यमु मेश्राम यांना पायउतार व्हावे लागले.





  Print






News - Chandrapur




Related Photos