बॅंकेने लिलावात काढलेले १ किलो ८ ग्रॅम सोने निघाले नकली


- खरेदीदारांमध्ये खळबळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा:
खरांगणा - मोरांगणा येथील बॅंक आॅफ इंडियाच्या शाखेत तारण म्हणून ठेवलेल्या १ किलो ७७१ ग्रॅम सोन्याच्या दागीण्यांपैकी तब्बल १ किलो ८ ग्रॅम सोने लिलावादरम्यान नकली निघाल्याने सोने खरेदीदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. 
प्राप्त माहितीनुसार बॅंक आॅफ इंडियाच्या शाखेत २०११ - १२ या वर्षात तारण काही ग्राहकांनी सोन्याची दागिणे गहाण ठेवले होते. गहाण सोन्याची मुदत संपूनही सबंधितांनी सोन्याची दागीणे सोडलिे नाही. बॅंकेने ९ कर्जदारांना नोटीस बजावून दागीणे लिलावात काढत असल्याचे कळविले. त्याप्रमाणे आज ३१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी अर्चना संतोष राजुरकर रा. दहेगाव गोंडी यांच्या ५५ ग्रॅम बांगड्या व शेख शब्बीर व रूखसाना बानो रा. मोरांगना यांच्या नावे असलेला ०.८ ग्रॅमचा सिक्का असे एकूण ६३ ग्रॅम सोने खरे आढळून आले. या सोन्याचा लिलावसुध्दा करण्यात आला. यानंतर मंगेश रामकृष्ण साठे रा. सावद यांच्या ५३८ ग्रॅम दागीण्यांच्या थैलीचे सिल तोडून सोनाराने सोने घासून पाहिले. यावेळी ते सोने नकली असल्याचे आढळून आले. यामुळे खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली. यानंतर नितेश वामनराव लिचडे मु. कासारखेड यांचे ३५० ग्रॅम, किशोर मोतीगिर गिरी रा. मदना यांचे ३५०  ग्रॅम, पुरूषोत्तम कालोकार रा. सावद यांचे ११५ ग्रॅम, गजानन मन्साराम उचके रा. सावद यांचे ११५ ग्रॅम, वामन सोमकुंवर यांचे १२० ग्रॅम, सतीश नारायण सिंदे रा. सावद यांचे १२० ग्रॅम सोने घासून बघितले असता नकली आढळून आले. 
लिलावात काढण्यात आलेले सोन्याचे दागिणे २०११ - १२  या  वर्षी तारण ठेवलेले असून सोने पारख करणाऱ्या  सोनाराने व तत्कालीन शाखा प्रबंधकाने काही ‘सेटींग’ तर केली नाही ना ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाबाबत मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2017-07-31
Related Photos