नोटाबंदीनंतर मोठे व्यवहार करणाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत भरावे लागणार विवरण पत्र


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त रक्कम जमा केलेल्यांना प्राप्तिकर विभागाने  येत्या ३१ मार्चपर्यंत विवरण पत्र (आयटीआर) भरण्याविषयी बजावले आहे. संबंधितांना ही माहिती देण्यासाठी शेवटची मुदत आहे. 
३१ मार्चपर्यंत  विवरण पत्र न भरल्यास संबंधितांना खटले आणि तक्रारींना सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशाराही प्राप्तिकर विभागाने  दिला आहे. वैयक्तिक करदात्यांसह, विश्वस्त, राजकीय पक्ष, कंपन्या आणि संस्थाही या कालावधीत विवरण पत्र भरू शकतात, असेही प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.  
या संदर्भातील सर्व माहिती प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी  प्रसिद्ध केली. त्यानुसार २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सुधारित विवरण पत्र भरता येणार आहे. या माध्यमातून संबंधितांना शेवटची संधी देण्यात येत असल्याचेही प्राप्तिकर विभागाने नमूद केले आहे.    Print


News - World | Posted : 2018-02-10
Related Photos