रेल्वेच्या १३ हजार ५०० दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर करणार निलंबित


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  रेल्वेच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. अधिकृतपणे न कळवता दीर्घकाळ रजेवर असणारे असे सुमारे १३ हजार ५०० कर्मचारी आहेत. 
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अधिकाऱ्यांना एक व्यापक मोहीम राबवत दीर्घकाळ रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी  तयार करायला सांगितली होती. यात एकूण १३ लाख कर्मचाऱ्यांपैकी १३,५०० कर्मचारी दांडीबहाद्दर असल्याची माहिती पुढे आली. 'अशा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात येईल,' असे रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.   Print


News - World | Posted : 2018-02-10
Related Photos