नवी मुंबईतील उद्योग संकुल उभारण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर : उद्योग मंत्री सुभाष देसाईविदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नवी दिल्ली : 
तरूणांनी उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करावी, यासाठी पुरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सुसज्ज असे उद्योग संकुल नवी मुंबईत उभारण्यासाठीचा प्रस्ताव आज केंद्राकडे सादर करण्यात आल्याची, माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.  देसाई यांनी आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांची संसदेत भेट घेतली. यावेळी त्यांनी हा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावीत उद्योग संकुलाविषयीची सविस्तर माहिती देत, हे उभारण्यासाठी केंद्राकडून आर्थिक सहायता मिळावी, अशी मागणी श्री देसाई यांनी केली. यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन सुरेश प्रभू यांनी यावेळी दिले. आज झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजु संघटनेच्या शिष्टमंडळाने  देसाई यांच्या अध्यक्षेतत सुरेश प्रभू यांची भेट घेतली. सिंधुदुर्गात मोठया प्रमाणात काजुचे उत्पादन घेतले जाते. वस्तु व सेवाकर लागल्यामुळे काजु उत्पादकांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या या अडचणी दूर व्हाव्या, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी विनंती  देसाई यांनी केली. याबाबत सकात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन सुरेश प्रभू यांनी दिले असल्याची माहिती, देसाई यांनी बैठकीतनंतर दिली. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री यांना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ चे निमंत्रण राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मुंबई येथे होऊ घातलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदचे निमंत्रण केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांना दिले. १८ ते २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन २०१८’ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन महाराष्ट्र शासनाने केलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे उद्योग मंत्री  देसाई यांनी सुरेश प्रभू यांना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’  कार्यक्रमाचे  निमंत्रण दिले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन २०१८’ या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून राज्याची उद्योग क्षेत्रातील भरारी, उद्योग क्षेत्रासाठी असलेले पूरक वातावरण, औद्योगिक वृद्धी मध्ये असलेले राज्याचे योगदान दर्शविण्यात येणार आहे.

   Print


News - World | Posted : 2018-02-08
Related Photos