प्लास्टिक कोटिंग किंवा लॅमिनेशन आधार कार्ड बिनकामाचे ठरणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
आधार कार्डला लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटिंग लावले असेल तर त्या आधारला काहीही अर्थ उरणार नाही , असे आता युआयडीएआय  ने स्पष्ट केले आहे. लॅमिनेशन केल्याने किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधार कार्डचा क्यू आर कोड काम करणे बंद होऊ शकते.  किंवा यामुळे खासगी माहिती चोरली जाऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे कळते. 
 कागदावर छापण्यात आलेलेच आधार कार्ड योग्य आहे असे UIDAI चे सीईओ अजय भूषण पांडे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर काही लोक प्लास्टिक कोटेड आधार कार्ड देण्याच्या नावाखाली लोकांकडून ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत पैसे उकळत आहेत असेही पांडे यांनी म्हटले आहे. एका  वृत्तसंस्थेने या संदर्भातले ट्विट केले आहे.   आधार कार्ड जेव्हा  लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटिंगसाठी दिले जाते तेव्हा  आधार कार्डवर असलेल्या क्यू आर कोडचा गैरवापर केला जातो पण आपल्या लक्षातही येत नाही. क्यू आर कोडद्वारे तुमची खासगी माहिती सार्वजनिक होते. आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आले तर तो एक गुन्हा आहे आणि कायद्यात त्यासाठी शिक्षा किंवा दंड भरण्याचीही तरतूद आहे असेही पांडे यांनी स्पष्ट केले आहे.  Print


News - World | Posted : 2018-02-06
Related Photos