वरोरा नाका येथील उड्डाणपुलावर पडलेला खड्डा त्वरीत बुजवा


- मनसेचे साबां विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन
- मागणी निकाली न निघाल्यास ‘खड्ड्यात झोपा काढा’ आंदोलन करणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी/ चंद्रपूर:
 वरोरा नाका येथे मागिल काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू होती. या बाबीची दखल घेवून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र उड्डाणपुल सुरू होवून तीन - चार महिन्यांचा कालावधी होत असताना पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे जिवितहाणी होण्याची शक्यता असून खड्डे त्वरीत बुजविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वरोरा नाका परिसरात बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर अल्पावधीतच खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. पुलावरून उतरताना वाहनांची गती रोखण्यास अडथळा निर्माण झाल्यास जिवीतहाणीसुध्दा होवू शकते. मात्र मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याकडे अधिकारी दूर्लक्ष करीत आहेत. वर्षभराच्या आतच पुलावर खड्डे पडल्यामुळे पुलाच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट होते. तसेच भ्रष्टाचारसुध्दा होण्याची शंका जनसामांन्यांच्या मनात आहे. यामुळे कंत्राटदारावरसुध्दा योग्य ती कारवाई करावी. तसेच येत्या सात दिवसांच्या आत रस्त्याची डागडूजी न करता कायमस्वरूपी उपाय करावा, अन्यथा मनसेच्या वतीने ‘खड्ड्यात झोपा काढा’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतना मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, उपाध्यक्ष शैलेश केळझरकर, कुलदीप चंदनखेडे, विवेक धोटे, दिलीप रामेडवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

   Print


News - Chandrapur | Posted : 2017-07-21
Related Photos