'आधार' बाबत पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा सुद्धा अनभिज्ञ ?


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
सुनील बोकडे / चंद्रपूर :
' एक कॉल करा, प्रशासनातील कोणतीही समस्या ३० दिवसात सूटेल'  या आशयाच्या  "हेलो चांदा " नावाच्या  हेल्पलाइनचे  ज़िल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधिर मुनगंटीवार यांनी नुकतेच लोकार्पण केले. मात्र  'आधार' बाबत पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा सुद्धा अनभिज्ञ असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. 
 पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा कार्यशील करण्याचा पालकमंत्र्यांच्या व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मानस आहे. " हेलो चांदा " ही हेल्पलाइन सुरु करण्यामागे मोठा आटापीटा जिल्हाधिकारी आसुतोष सलिल यांचाच आहे . हे सर्व करायला अधिकारी महोदयांना मोठी सबळ मिळाली.  मात्र गत तीन महिन्यापासुन जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे अत्यावश्यक "आधार कार्ड " बनणे बंद असल्याने नागरिकांचे बेहाल होत असतांना प्रशासन मात्र ढिम्म आहे. याचाच अर्थ जिल्ह्यातील जनतेच्या गंभीर समस्येपासुन पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा अनभिज्ञ असेल तर इतर चुटुक मुटुक समस्यांबाबत किती गंभीर राहणार यबाबत  शंका व्यक्त होत आहे.   प्रत्येक शासकीय योजनां करिता, दैनंदिन व्यावहाराकरिता आधारकार्ड सक्तीचे असतांना गत ३ महिन्यांपासुन ज़िल्हा प्रशासन एवढ्या गंभीर समस्येबाबत  अनभिज्ञ कसे राहु शकते ? हा शंकापूर्ण प्रश्न चर्चेत आहे. एवढ्या गंभीर समस्येवर ज़िल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी आतातरी लक्ष देतील काय?  या प्रश्नाच्या उत्तराकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2017-07-19
Related Photos