तीन महिन्यापासुन आधारकार्ड तयार करणे बंद, यु. आई. डी. विभाग हतबल


" आधार " यंत्रणा झाली " निराधार "  भाग : २
विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
सुनिल बोकडे / चंद्रपूर :
 गत ३ महिन्यापासुन आधारकार्ड बनने बंद आहे. मात्र विविध शासकीय ,वित्तीय , शैक्षणिक विभागाचा "आधार " साठी तगादा थंबलेला नही हे विशेष.  आधारकार्ड वितरण व्यवस्था केंद्र  शासनाच्या अखत्यारित आहे. त्याचे मुख्यालय बेंगलोर इथे असले तरी महाराष्ट्रातील जनतेला आधार कार्ड सुविधा देण्यासाठी यु. आय. डी. तर्फे मुंबई येथे राज्याचे मुख्यालय देण्यात आले आहे . प्रत्येक जिल्ह्यात एजेंट नेमण्याची प्रक्रिया ऑनलाइन परिक्षेद्वारे बेंगलूर येथून पार पडते. असे असले तरी मात्र नागरिकांचा व्यवहार आधारकार्ड सोबत लिंक करून विविध शासकीय योजनांमधे सहभागी होणाऱ्या जिल्हा प्रशासनास या संबंधाने मोठी माहिती अथवा अधिकार नसल्याची दुर्देवी बाब पुढे येत आहे. 
गत तीन महिन्यांपासुन जिल्ह्यात आधारकार्ड बनणे बंद आहे . नागरिकांची मोठी गळचेपी सुरु आहे.  मात्र जिल्हा प्रशासन अनभिज्ञ आणि हतबल आहे. आधारकार्ड सबंधाने जिल्हाधिकारी कार्यालयात एकमेव लिपिक असून योजनांचा ढिंढोरा पिटून शासकीय योजनांमधे सहभागी होण्याचे आवाहन करणारे अधिकारी मात्र यबाबत गंभीर नसल्याची बाब आधारकार्ड निमित्याने पुढे आली आहे.
 चंद्रपुर जिल्ह्यात गत तीन महिन्यापासुन आधारकार्ड बंद झाल्याने ज़िल्हावासियांची गळचेपी सुरु असल्याची बाब लक्षात येताच मुम्बई येथील यु.आय. डि. विभागातील मीडिया मैनेजर अंकित अय्यर यांच्याशी फोनवर चर्चा केली असता ,या संबंधाने कुठ्लेही कारण न देता , यासंबंधी विषयी आमच्या वरिष्ठांशी चर्चा करावी आणि माझा नंबर तुम्हाला कोणी दिला,  असा उलटा  प्रश्न केला. त्यांना  वरिष्ठांचा फोन नंबर मगितल्यावर त्यांनी  नकार दिला.
 जिल्ह्यात आतापर्यंत सात लखावर आधारकार्ड तयार करण्यात आले आहेत.  तयार  झालेल्या आधारकार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटि आहेत .त्या त्रुटि दुरुस्ती करण्याचे काम रखडल्याचे दिसते. जवळपास ५ लाखावर जास्त नागरिकांचे नवीन आधारकार्ड तयार करायचे आहेत. जिल्ह्यात २५० अधिकृत केन्द्रधारक हातावर हात ठेऊन बसले आहेत. जिल्ह्यातील जनतेला देवापेक्षा शासनाच्या "आधार " ची जास्त गरज असल्याची दिसते.  Print


News - Chandrapur | Posted : 2017-07-18
Related Photos