स्व. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त २३ युवकांनी केले रक्तदान


- अहेरीत गंगादेवी उत्सव, वृक्षारोप, उपजिल्हा रूग्णालयात फळवाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी/ अहेरी:
स्व. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज आत्राम यांच्या पुण्यतिथी व गंगा देवी उत्सवाचे औचित्य साधून अहेरी येथे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात २३ युवकांनी रक्तदान केले. तसेच उपजिल्हा रूग्णालयात रूग्णालयात फळवाटप करण्यात आले.
स्व. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोई समाज बांधवांच्या वतीने अहेरी उपजिल्हा रूग्णालयात फळवाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा, प्रविणरावबाबा आत्राम, नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार, पोलिस निरीक्षक सुरेश मदने, मुख्याधिकारी कुलभुषण रामटेके, अहेरी भाजपा अध्यक्ष प्रकाश गेडाम, नगरसेविका कमलताई पडगेलवार, ठाकरे, नारायण सिडाम, श्रीनिवास चटारे, अमोल मुक्कावार, अमोल गुडेल्लीवार, क्रिष्णा मचार्लावार, दिलीप पडगेलवार, शंकर मगडीवार, मुकेश नामनवार, नारायण मगडीवार यांच्यासह नगरसेवक, नाविस व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. भोई मोहल्ल्यात अवधेशरावबाबा आत्राम यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2017-07-17
Related Photos