गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी ‘टास्क फोर्स’, डाॅ. अभय बंग अध्यक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली:
राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, सर्च फाउंडेशन गडचिरोली, नॅशनल इन्स्टिट्युट फार रिसर्च इन ट्रायबल हेल्थ जबलपूर आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संर्चचे संचालक डाॅ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी कार्यगट स्थापन करण्याचे आदेश शासनाने १३ जुलै रोजी काढले आहेत. 
या कार्यगटामध्ये सहअध्यक्ष म्हणून आरोग्य सेवा संचालनालय मुंबईचे संचालक राहतील. तर सदस्य म्हणून माजी आरोग्य महासंचालक डाॅ. सुभाष साळुंखे, राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन संस्था जबलपूरचे संचालक, टाटा रूग्णालय मुंबई, टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम नवी दिल्लीचे तज्ञ प्रतिनिधी, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे किटकशास्त्रज्ञ, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तथा संचालक, आरोग्य सेवा सहसंचालक यांचा समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत आरोग्य सेवा पुणेचे सहाय्यक संचालक व मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्रान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्ह्यात कार्यगट स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
मलेरिया नियंत्रण कार्यकटाची कार्ये व उद्दिष्ट
स्थापन करण्यात आलेला कार्यगट  गडचिरोली जिल्ह्यातमील हिवताप परिस्थितीचा अभ्यास करणे, जिल्ह्यातील विताप परिस्थितीचे विश्लेषण करून वाढीची कारणे व करावयाच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करणे, गडचिरोली जिल्ह्यातील किटकनाशकांची फवारणी, भारीत मच्छरदाणी, आवश्यक मनुष्यबळ या बाबींचे सुयोग्य व्यवस्थापन करणे, स्थानिक भाषेतून प्रभावी आरोग्य शिक्षण देण्यासाठी कृती योजना आखणे, औषधांच्या तसेच किटकनाशकांच्या प्रतिरोधांचा अभ्यास करणे, लक्षण विरहीत रूग्ण तसेच लहान बालकांमधील प्लीहा दर यांचा अभ्यास करणे, शेजारील राज्यांतील हिवताप परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून त्या अनुषंगाने आंतरराज्य सभेचे आयोजन करणे, गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप रूग्णांचे प्रमाण ३ वर्षांत कमीत कमी  कसे राहील यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तयार करण्याचे कार्य करणार आहे. 

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2017-07-16




Related Photos