कोरपना पं.स. चा गटशिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात


- कार्यमुक्तीचे आदेश देण्यासाठी शिक्षकाकडून मागिलती ३ हजारांची लाच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी/ चंद्रपूर:
आतंरजिल्हा बदली झाल्यानंतर कार्यमुक्तीचा आदेश देण्यासाठी सहाय्यक शिक्षकाकडून ३ हजार रूपयांची लाच स्वीकारणारा कोरपना पंचायत समितीचा गटशिक्षणाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
महमदुल हसन असे अटक करण्यात आलेल्या गटशिक्षणाधिकार्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार हे कोरपना पंचायत समिती अंतर्गत कन्हाळगाव जि.प. शाळेत सहाय्यक शिक्षक होते. त्यांची आंतरजिल्हा बदली औरंबाद येथे झाली. ते कार्यमुक्तीचा आदेश घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी हसन याच्याकडे गेले. यावेळी गटशिक्षणाधिकारी हसन याने कार्यमुक्तीचा आदेश पाहिजे असल्यास ३ हजार रूपये द्यावे लागतील, फुकट काम करीत नाही असे बजावले. याबाबत शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
आज १२ जुलै रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला. लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी हसन याने साक्षीदारांसमोर ३ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारली. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. 
सदर कारवाई पोलिस उपायुक्त पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक डी.एम. घुगे, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, मनोज पिदुरकर, भास्कर चिचवलकर, समिक्षा भोंगळे यांनी केली.

   Print


News - Chandrapur | Posted : 2017-07-12
Related Photos