राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन २४ जुलैपासून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
 महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०१७  चे तिसरे (पावसाळी) अधिवेशन २४ जुलै  पासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन ११ ऑगस्ट २०१७ पर्यंत चालणार आहे. या १९ दिवस चालणाऱ्या अधिवेशनात चार सुट्टयांचे दिवस असून एकूण कामकाजाचे १५ दिवस  असणार आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शनिवार, २९ जुलै  रोजी बैठक होणार नाही तर रविवार, ३० जुलै  आणि रविवार, ६  ऑगस्ट  रोजी सार्वजनिक सुट्टी असणार आहे. सोमवार, ७  ऑगस्ट  रोजी येणाऱ्या रक्षाबंधन निमित्ताने कामकाज होणार नाही. त्या ऐवजी शनिवार, ५ ऑगस्ट  रोजी कामकाज सुरु राहणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिली.यावेळी विधानसभा कामकाज ठरविताना विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह विधानसभेतील पक्षांचे गटनेते व वरिष्ठ सभासद उपस्थित होते. त्याचप्रमाणे विधानपरिषदेचे कामकाज ठरविताना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विधानपरिषदेतील सर्व पक्षांचे गटनेते, वरिष्ठ सभासद उपस्थित होते.  Print


News - Rajy | Posted : 2017-07-11
Related Photos