खानगाव येथे दारूबंदीसाठी महिला सरसावल्या, सरपंच व तंमुस अध्यक्षावरच पहिली कारवाई


- पहिल्याच झटक्यात पोलिसांना कारवाईस  पाडले भाग  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका  प्रतिनिधी / चिमूर :  
तालुक्यातील  शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खानगाव येथे दारूचा  सुळसुळाट झाल्याने दारू पिणाऱ्याची संख्या वाढत जात असताना त्या दारू पिणाऱ्याच्या कुटूंबातील महिलांना त्रास सहन करावा लागत होता . अश्यातच महिला एकत्रित येऊन दारू बंदी समीती  गठीत केली . अध्यक्ष असलेल्या रेखा दडमल यांच्या  नेतृत्वात पाळत ठेवून पहिल्याच झटक्यात गावचा कारभारी सरपंच एकनाथ धोटे व तमुस अध्यक्ष असलेला संरक्षक मारोती सोयाम यांनी दारू पिऊन महिलांशी असभ्य वर्तन करून  धक्काबुक्की  दिल्याने शेगाव पोलिसांनी कारवाई करून कलम ११० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे   दारू विक्रेत्यामध्ये व दारुड्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे. 
 खानगाव येथील सरपंच एकनाथ धोटे हे  कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक असताना ते दारू विकणारे व पिणारे याना आशीर्वाद देऊन त्याची बाजू घेत होते.  त्यांच्या सोबतीला महात्मा गाधी तंटामुक्त समिती चे अध्यक्ष मारोती सोयाम सुद्धा  होते.  यामुळे गावात दारूचा सुळसुळाट वाढला होता.  कुटुंब उध्वस्त होत होते.  महिला त्रस्त झाल्या होत्या. महिलांनी  ठाणेदार बारसे यांच्या उपस्थितीत ४ जूनला दारूबंदी समितीची स्थापना करून अध्यक्ष  हिराबाई  दडमल ,उपाध्यक्ष प्रेमीला कारमेगे, सचिव दीपाली चौखे ,रंजना चौखे,शोभा राणे,ललिता रामटेके,कल्पना ननावरे,मुक्ता राजूर कर आदी महिला समाविष्ठ करून त्या सर्व महिला ८ जून च्या रात्री पाळत ठेवून बसल्या होत्या.  त्याच वेळेस सरपंच एकनाथ धोटे व तमुस अध्यक्ष मारोती सोयाम हे दारू पिऊन येत होते.  महिलांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता महिलांना धक्के देऊन निसटले व महिलांना धमकी दिली.   त्यामुळे महिला संतप्त झाल्या आणि भ्रमणध्वनी वरून पोलिसांना माहिती दिली.  पोलीस खानगाव येथे आल्यावर धोटे व सोयाम पळून गेले.  महिलांनी पोलीस स्टेशन गाठून तोंडी हकीकत सांगितली.  नंतर पोलिसांनी एकनाथ धोटे व मारोती सोयाम वर कलम ११० नुसार  गुन्हा  दाखल करून अटक केली. 
वाहनगाव ,खानगाव ,सावरी परिसरात दारूचा पूर असून पोलीस विभागाने  दखल घेऊन दारूबंदी करावी अशी मागणी होत आहे. तर  खानगाव येथील महिलांचा  आदर्श घेऊन महिला एकजूटीने दारू बंदी करावी असा सूर आता परिसरात निघत आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2017-07-11
Related Photos