अखेर 'त्या' नरभक्षी वाघिणीची घरवापसी


- वनविभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे वनाधिकाऱ्यांचे आवाहन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी/ सेलू  :
१० जुलै २०१७ रोजी  दक्षिण ब्रम्हपुरी वनक्षेत्रातून पकडलेल्या वाघिणीला २६ जुलै रोजी वर्धा जिल्हातील सेलू तालुक्यातील बोर  व्याघ्र प्रकल्पाच्या नवरगाव वनक्षेत्रात आणण्यात आले . पाच दिवस तिला तिथे बंदिस्त ठेऊन वन्यजीवप्रेमींनी केलेल्या मागणीमुळे कोर्टाने तिला सुधारण्याची संधी देत ४ ऑगस्टला    मोकळे सोडण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत ७६ दिवसांचा तिचा प्रवास डोंगरदऱ्यातून, शेतशिवारातून, राष्ट्रीय मार्ग ओलांडून , गावखेड्यातून असा जवळपास ५०० किलोमीटरचा प्रवास करीत मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजल मारत परतीचा  प्रवास करीत घावापसी करीत बोर अभयारण्याच्या तलावात धोटीवाडा नजीकच्या परिसरात १२ सप्टेंबरला सकाळी ११ चे सुमारास असल्याचे रेडिओ कॉलरवरून   समजले. 
त्या वाघिणीचा ७६ दिवसांचा प्रवास हा अत्यंत जोखमीचा होता.   हैदराबाद येथील प्रख्यात शार्प शुटर शफात अली खान व त्यांचे सहा सहकारी सोबतीला १५० वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, दोन हत्ती, आणि काही चारचाकी वाहने हा सर्व स्टाफ तिला बेहोष करून पकडण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत . पण तिने सुद्धा या सर्वांना गुंगारा देत नरभक्षाची आपली जुनी खोड कायम ठेवत ७ सप्टेंबर रोजी  आष्टी तालुक्यातील शेतकऱ्याचा बळी घेतला. तर २१ सप्टेंबर एका शेतकऱ्याला जखमी केले.  २ आक्टोबरला महिलेचा बळी घेतला.   पहिले पन्नास दिवस टी  - २६ सी आई असे नामकरण केलेल्या त्या वाघिणीने फक्त जनावरांवरच ताव मारला . त्यामुळे वन्यजीवप्रेमी व अधिकाऱ्यांना ती सुधारली असे वाटत असतांना दोन बळी व एकास जखमी करून वरुड, मोर्शी , नरखेड, करीत कोंढाळी, असा पाचशे किलोमीटर   प्रवास करीत २ सप्टेंबरला तिने बोर अभयारण्याच्या धोतीवाडा  गावजवळ दस्तक दिली. राष्ट्रीय वन्यजीव  समितीचे सदस्य किशोर रिठे यांनी सांगितले कि पट्टेदार वाघांना आपल्या जुन्या अधिवासात येणे आवडते.  त्यामुळे ती वाघीण परत आपल्या जुन्या अधिवासात अली आहे. 

   Print


News - Wardha | Posted : 2017-10-12
Related Photos