सत्यसाई सेवा संघटना गडचिरोलीतर्फे ‘स्वच्छता से दिव्यता’ तक उपक्रम


- २० आॅक्टोंबरपर्यंत स्वच्छता अभियान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
श्री सत्यसाई सेवा संघटना गडचिरोलीच्या वतीने २ आॅक्टोबरपासून २० आॅक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता से दिव्यता’ हा उपक्रम राबविला जात आहे. दररोज सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत शहरातील विविध भागात स्वच्छता केली जात आहे.
२ आॅक्टोबर रोजी इंदिरा गांधी चौक परिसर, राममंदिर परिसर, जिल्हा सामाप्य रूग्णालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नाल्यांमधील गाळसुध्दा काढण्यात आला. रविवारी आठवडी बाजारानंतर परिसरात साफसफाई करण्यात आली. तसेच मरार मोहल्ला, रोहिदास मंदिर आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. २० आॅक्टोबरपर्यंत दररोज विविध प्रभागांमध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे. या अभियानात संघटनेचे सेवक सहभागी होत आहे. या उपक्रमात शहरवासीयांनीसुध्दा सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2017-10-12




Related Photos