वरोरा शहरात पेट्रोल व डिझेलची तीव्र टंचाई : वाहनधारक त्रस्त


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
शहरात व परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मागील काही दिवसापासून 'पेट्रोल नाही'चा फलक दिसून येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या टंचाईने वरोरा शहर व ग्रामीण भागातील वाहन धारक त्रस्त झाले आहेत .
 पेट्रोल व डीझेल मिळविण्याकरिता वाहन धारकांची  चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. वरोरा शहरात व शहर लगत पेट्रोल पंप आहे . येथील  एक पेट्रोल पंप बंद आहे. तालुक्यात खांबाळा , टेमुर्डा , माहिली, चरूर खरी, शेगाव येथील प्रत्येकी एक पेट्रोल पंप आहे. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलची टंचाई फार कमी असल्याची माहिती आहे. परंतु वरोरा शाहहरातील पेट्रोल पंपावर मागील अनेक दिवसापासून पेट्रोल व डिझेलची टंचाई ही  नेहमीचीच बाब झाली आहे. वरोरा शहरात न्यायालय, उपविभाग कार्यालय, पोलीस उपविभागीय कार्यालय असे  अनेक अति महत्वाची कार्यालये आहेत . परिसरात असलेल्या खाजगी कंपन्या व वरोरा शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने वरोरा शहरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आवागमन दुचाकी व चारचाकी वाहनाने होत असते . सर्वच वाहन धारक वरोरा शहरात डीझेल व पेट्रोल वाहनात टाकू अश्या विचाराने येत असतात.  अशा वाहनधारकांना वरोरा शहरात पेट्रोल व डीझेल मिळत नसल्याने मोठा भ्रमनिरास होतांना दिसून येते.  डीझेलअभावी चारचाकी वाहने जागी उभी असल्याने अनेकांनी  व्यवसाय दिवाळीच्या तोडावर डबघाईस आले आहे. उष्णतामान  अधिक असल्याने डीझेल इंजिनच्या साहाय्याने  पिकांना पाणी  देण्याऱ्या  शेतकऱ्यांनाही डीझेल टंचाईचा फटका बसत आहे. शहरातील संपूर्ण पेट्रोल पंपावर डीझेल व पेट्रोल टंचाई निर्माण होत असतांना याची स्थानिक प्रशासनास कुठलीही माहिती नसावी या बाबत आश्चर्य  व्यक्त केले जात आहे. अचानक पेट्रोल संपल्याने टंचाई निर्माण झाली आज संध्याकाळ पर्यंत वरोरा शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल येईल पेट्रोल टंचाई बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण लिहून माहिती देणार असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक मीनाक्षी चौधरी यांनी दिली आहे.  

   Print


News - Chandrapur | Posted : 2017-10-12
Related Photos