आंतरराष्ट्रीय सायन्स फेस्टीवल मधून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी होतकरू वैज्ञानिक निर्माण होण्यास मदत मिळेल


-  केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.  हंसराज अहीर यांचे प्रतिपादन 
- इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टीवल मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे ना. हंसराज अहीर यांनी केले स्वागत 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / चंद्रपूर
:  भारत सरकारने सन २०१० -२० हे दशक नवोन्मेष दशक म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. या अनुशंगाने केंद्रीय विज्ञान आणि तंत्राज्ञान तथा पृथ्वी विज्ञान मंत्रालय व विज्ञानभारती च्या संयुक्त विद्यमाने ‘‘नवभारतासाठी विज्ञान’’ या विषयावर तिसरा ‘भारत अंतरराष्ट्रीय विज्ञान उत्सव’ चेन्नई, तामिळनाडू येथे १३ ते १६ आॅक्टोंबर पर्यंत आयोजित करण्यात आला असून या उत्सवात घोडपेठ व माढेळी या ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होत आहेत ही बाब अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी असून या उत्सवाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे हा असून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रामध्ये वैज्ञानिक व तांत्रिक ज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यास निश्चितच बळ मिळेल असा आशावाद केंद्रीय गृह राज्यमंत्री  ना. हंसराज अहीर यांनी या विद्यार्थी व शिक्षकांना निरोप देतांना व्यक्त केला.
  या कार्यक्रमास आ. नाना  शामकुळे वरोराचे नगराध्यक्ष अहतेशाम अली, भाजपा जिल्हा सरचिटणीस राहूल सराफ, डाॅ. अनिल बुजोने, भाजप नेते बाबाभाऊ भागडे, ओमप्रकाश मांडवकर, वरोरा तहसिलदार  गोसावी, राजू गायकवाड,   ज्योतीताई वाकडे, कर्मवीर विद्यालय घोडपेठचे मुख्याध्यापक सदाशिव माहुरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात ११  आॅक्टोंबर रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सायन्स फेस्टीवलकरिता जाणाऱ्या किसान विद्यालय माढेळी येथील इयत्ता दहावीचे विद्यार्थी गौरव चंदू मोहुर्ले, सुरज नानाजी वैद्य, राकेश सुरेशराव गिरटकर तसेच घोडपेठ येथील प्रज्वल अंकुश घोटकर, युवराज जानकीराम मांडवकर या विद्याथ्र्यांचा पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व त्यांच्या भावी शैक्षणिक प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या. 
 प्रधानमंत्राी नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, आदर्श ग्राम या योजनांना सहाय्यता पोहचविणे ही भुमिकासुध्दा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टीवलच्या आयोजनामागे असल्याचे ते म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनीही या सर्व विद्याथ्र्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या  Print


News - Chandrapur | Posted : 2017-10-12
Related Photos