भरधाव बसने ट्रॅक्टरला उडविले ; प्रवासी थोडक्यात बचावले


-   विहिरीमुळे टळला मोठा जीवित हाणीचा धोका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / हिंगणघाट :
हिंगणघाट हुन चिमुरला जात असलेल्या बसचा ताबा सुटल्याने अपघात झाला. बस चालक  अ.बी.नगराळेचा बसहुन ताबा सुटल्याने पुढून  येण्याऱ्या ट्रॅक्टर ला बसने जोरदार धडक दिली. ही घटना हिंगणघाट ते नंदोरी रोड वर पार्ले गोडावून कडाजन्या जवळ घडली. 
बसद्वारा ट्रॅक्टर ला दिलेली   धडक एवढी जोरदार होती कि ट्रॅक्टर पूर्ण उलटा झाला व बस धडक देऊन ५० फूट समोर रोडच्या बाजूला विहिरीत जाऊन फसली. ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरहुन उडी  घेतल्याने  चालक मंगेश सुभाष वंजारे (२२) याचा जीव थोडक्यात बचावला.   त्याच्या पायाला  मार लागला असल्याने तो उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. बस मधे असलेले सर्व ५० प्रवाशी सुखरूप असून मोठा अनर्थ टळला. ट्रॅक्टर चालक मंगेश वंजारे आपल्या शेतातील कल्टिव्हेटरचे काम  करून ट्रॅक्टर क्र. महा. ३२ पी. ५५८८ ने डिझल टाकायला  किन्हाळ्याहुन हिंगणघाटला आपल्या दिशेने येत होता.  हिंगणघाट येथून चिमुरला जाणारी बस क्र. महा ४० एन ८६२९   चा टायर ट्रॅक्टर च्या कल्टिव्हेटर  ला लागल्याने समोरचा  टायर फुटला व बस रोड़खाली उतरून विहिरीत अडकली . या विहिरी अडकलेल्या बस च्या टायरमुळे मोठा अनर्थ टळला. विहिरीत टायर अडकून बस थांबली  अन्यथा समोर असलेल्या इमारतीवर बस आदळून मोठी जीवित हानी होण्याचा धोका होता.  Print


News - Wardha | Posted : 2017-10-11
Related Photos