कस्‍तूरबा सन्‍मान गौरवाची बाब : डॉ. राणी बंग


- डॉ. राणी  बंग, कुसुमताई पांडे यांना कस्‍तूरबा सन्‍मान प्रदान
- हिंदी विश्‍वविद्यालयातील स्‍त्री अध्‍ययन विभागाचे आयोजन
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
  कस्‍तूरबा गांधी यांच्‍यामध्‍ये समर्पण, त्‍याग, निर्भयता, पराक्रम आणि साहस इत्‍यादी गुण होते. त्‍यांच्‍या नावाचा सन्‍मान मिळणे माझ्यासाठी गौरवाची बाब होय, अशा शब्‍दात ज्‍येष्‍ठ समाजसेविका डॉ. राणी  बंग यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.
 महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयातील स्‍त्री अध्‍ययन विभागाच्‍या वतीने देण्‍यात येणारा ‘कस्‍तुरबा सन्‍मान’ स्‍वीकारल्‍यानंतर त्‍या बोलत होत्‍या. ४ व ५ ऑक्‍टोबर रोजी ‘कस्‍तूरबांच्‍या नावे : स्‍वातंत्र्याची चळवळ आणि महिला’ या विषयावर विश्‍वविद्यालय तसेच गांधी स्‍मृति व दर्शन समिती, दिल्‍ली यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय चर्चासत्र घेण्‍यात आले. समापन कार्यक्रमात गडचिरोली जिल्‍हयात आदिवासी समुदायामध्‍ये गेल्‍या ४०  वर्षांपासून समाजसेवेचे कार्य करणाऱ्या  डॉ. रानी बंग आणि वर्धेतील सेवाग्राम आश्रमात महात्‍मा गांधी यांच्‍या बुनियादी शिक्षणाशी जुडलेल्‍या वरिष्‍ठ सेविका कुसुमताई पांडे यांना कुलसचिव क़ादर नवाज़ खान यांच्यावतीने ‘कस्‍तूरबा सम्‍मान’ प्रदान करण्‍यात आला. यावेळी साहित्‍य विद्यापीठाचे  प्रो. के. के. सिंह, समन्‍वयक व स्‍त्री अध्‍ययन विभागाच्‍या प्रभारी विभागाध्‍यक्षा डॉ. सुप्रिया पाठक, सह संयोजक डॉ. अवंतिका शुक्‍ला, संगोष्‍ठी संयोजक शरद जायसवाल मंचावर उपस्थित होते.  कुलसचिव क़ादर नवाज़ ख़ान यांनी डॉ. रानी बंग व  कुसुमताई पांडे यांना कस्‍तूरबा सन्‍मान स्‍वरूपात शाल आणि स्‍मृतिचिन्‍ह प्रदान केले. आपले मनोगत व्‍यक्‍त करतांना कुसुमताई पांडे म्‍हणाल्‍या की सेवाग्राम आश्रमात गांधी विचाराने प्रभावित होऊन बुनियादी शिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आणि तेथेच ३०  वर्ष अध्‍यापनाचे काम केले. त्‍यांनी सेवाग्राम आश्रमाशी संबंधित स्‍मृतिंना उजाळा दिला. यावेळी प्रतिनिधींना प्रमाण पत्र प्रदान करण्‍यात आले. संचालन डॉ. अवंतिका शुक्‍ला यांनी केले तर आभार डॉ. सुप्रिया पाठक यांनी मानले. यावेळी अध्‍यापक, अधिकारी, विद्यार्थी आणि प्रतिनिधी मोठया संख्‍येने हजर होते.   Print


News - Wardha | Posted : 2017-10-06
Related Photos