ट्रॅव्हल्समधील अश्लिल व्हिडीओ प्रकरणी रविंद्र बावनथडेवर नागभिड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल


- युवतीने दिली पोलिसात तक्रार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
सुनिल बोकडे / चंद्रपूर :​
दोन दिवसांपासून सर्वत्र सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या ट्रॅव्हल्समधील अश्लिल व्हिडीओ क्लिपबाबत आरमोरी येथील रविंद्र बावनथडे याच्याविरूध्द  नागभिड येथील सदर युवतीने  नागभिड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नागभिड पोलिसांनी रविंद्र बावनथडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच अन्य अज्ञात आरोपीवरसुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून आरोपी रविंद्र बावनथडे हा फरार झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मागिल दोन दिवसांपासून नागपूूर - गडचिरोली मार्गावर प्रवासादरम्यान एका खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना ट्रॅव्हल्समध्येच मागील सीटवर अश्लिल कृत्य करताना सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा व्हिडीओ व्हारयल झाला होता. हा व्हिडीओ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक व्हाॅट्सअॅप गृपवर पसरला. यावेळी व्हिडीओमध्ये दिसणारा इसम आरमोरी येथील असल्याची जोरदार चर्चा होती. याबाबत काल युवतीने नागभिड पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. फिर्यादीमध्ये तिने  रविंद्र बावनथडे याने नोकरीचेे तसेच लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे नमुद केले आहे. युवतीच्या तक्रारीवरून नागभिड पोलिसांनी कलम ३७६ (२) क, ब, ६६ इ, ६७ , ६७ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र बावनथडे हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती नागभिड पोलिसांनी दिली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2017-07-11
Related Photos