महाकाली मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने ऐतिहासिक चंद्रपूर नगरी दुमदूमली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / चंद्रपूर :
नवरात्रोत्सवानिमित्त चंद्रपूर येथील महाकाली मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून ऐतिहासिक चंद्रपूर नगरी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे.
त्रेधा युगातील राजा कृतध्वजाचा पुत्र सुनंद यांना जमिनीत उत्खनन करताना एका भुयारी शिलेवर कोरलेली स्वयंभू, भव्य अशी मूर्ती आढळली. ती म्हणजे महाकाली मातेची मूर्ती होय. यानंतर द्वापर युगात चंद्राश राजाने मंदिराचा जिर्णोध्दार केला. ऐतिहासिक काळातील गोंडराजा विरशाहची पत्नी राणी हिराईने इ.स. १७०४ पुर्वी असलेल्या लहान मंदिराच्या मुळ बांधणीच्या चार खांबावर पुर्वेस व पश्चिमेस जोडले. खांब तयार केल्यावर सध्याचे कमानयुक्त असणारे मंदिराचे बांधकाम करण्यात आले. राजे विरशाहाचे पराक्रमाचे प्रतिक म्हणून राणी हिराईने चैत्र पौर्णिमेला महाकाली देवीची उत्सवाची सुरूवात केली. नांदेड येथील देवी उपासक राजाबाई देवकरीनस १९८० साली चैत्रपौर्णिमेला भक्तांसोबत १५ दिवस उत्सवरूपी उपासणा केली. येथून महाकाली यात्रेला प्रारंभ झाला.
इस्ट इंडिया कंपनीने १८३९ चे अर्धाण्याचे दुर्मिळ असे नाण्यावर छायाचित्र दिले आहे. त्यावर जय महाकाली असे अंकीत केले आहे. दुसऱ्या बाजूस इस्ट इंडिया कंपनीने १८३९ असे लिहिले आहे. मंदिरात मोगल शाही शैलीच्या छाप असलेल्या बांधकामावर आदित्य पध्दतीचे विशेष चिन्ह वाघ समृध्दीचे प्रतिक हत्ती कोरलेले आहे. तसेच मंदिराचे दक्षिणेकडील भागात कमानयुक्त लालसर कैय्या प्रमाणे चित्र आखलेले आहे. चंद्रपूर हे पुराणिक कालीन प्राचिन व ऐतिहासिक नगरी व चंद्राश रूपाने महाकालीचे एक स्थान रत्नागिरी जिल्ह्यातील आडीवरे येथे आहे. दुसरे महाकालीचे स्थान रत्नागिरी जिल्ह्यातीलच अडूळ येथे आहे. तिसरे स्थान अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी येथे आहे. चौथे स्थान गुजरात राज्यातील कालुका पावागड येथे आहे. पाचवे अत्यंत महत्वाचे स्थान चंद्रपूर येथे आहे. महाकाली मंदिराचे व्यवस्थापक स्वयंवंश परंपरेप्रमाणे चालत आहेत. त्यांच्या घराण्याच्या सात पिढ्यांपासून महाकाली अंचलेश्वर व एकविरा माता महाकाले परिवाराकडे असल्याची माहिती देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

महाकाली मातेच्या घटस्थापनेनंतर एकविरा माता मंदिरात पाठविले जाते वस्त्र

चंद्रपूर येथील महाकाली मंदिरात घटस्थापना करण्यात आल्यानंतर येथून वस्त्र वाजत - गाजत एकविरा माता मंदिरात नेले जाते. या ठिकाणी वस्त्र चढविल्यानंतर घटस्थापना केली जाते. चैत्र नवरात्रनिमित्तसुध्दा भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. महाराष्ट, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड राज्यातून लाखो भाविक चंद्रपूर येथे दर्शनासाठी रिघ लावत असतात. आषाढीनिमित्तसुध्दा भाविकांची मोठी गर्दी असते.  Print


News - Chandrapur | Posted : 2017-09-24
Related Photos