सिरोंचा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा
: तालुका मुख्यालयापासून ३ किमी अंतरावर असलेल्या रामंजापूर जवळील  पेट्रोल  पंपाजवळ रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिल्याने  अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. 
शंकर तमुलवार रा. सिरोंचा असे गंभीर जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्याला रूग्णालयात हलविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार तेलंगणा राज्यात रेती वाहतूक करीत असलेल्या ट्रकने निजामाबाद - सिरोंचा - जगदलपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वर रामंजापूर गावानजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर शंकर तमुलवार यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये शंकर तमुलवार गंभीर जखमी झाले आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2017-09-21
Related Photos