निमढेला प्रकल्पग्रस्तांना शेती, घर व मूलभूत सुविधा मिळणार


- आमदार धानोरकर यांनी शिष्टाई 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
लखन केशवाणी  / वरोरा
:  तालुक्यातील निमढेला गावानजीक चांदईनला धरण बांधण्यात आले . यामध्ये शेती गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्यावेळी त्या दरानुसार मोबदला देण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना शेती घरे व गावात मूलभूत सुविधा देण्यात आल्या नसल्याने मागील काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरु केले. अखेर आमदार बाळू धानोरकर यांनी शिष्टाई दाखविल्याने प्रकल्पग्रस्तांना शेती घर व मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन एका वैठकीत जिल्हाकधिकऱ्यांनी दिले. 
वरोरा तालुक्यातील निमढेला येथील चंदई  नाला धरण सन १९७६-७७  मध्ये निर्माण करण्यात आले. यामध्ये निमढेला येथील ४६ शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात अली. त्यावेळी शेतजमिनीचा मोबदला देण्यात आला. त्यातील ६५ टक्के रक्कम शेतकऱ्यांनी त्यावेळेच्या निर्णयानुसार शासनाकडे जमा केली. या रक्कमेमधून प्रकल्पग्रस्तांना शेती  देणार होते. या सोबतच प्रकल्पग्रस्तांना घराकरीता  जागा उपलब्ध  करून देणार होते. परंतु मागील ४० वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना शेती व घराकरीता जागाही त्यांच्या नावावर देण्यात आली  नसल्याने  प्रकल्पग्रस्त मेटाकुटीस आले होते. जागा नावावर नसल्याने शासनाच्या  सुवीधा प्रकल्पग्रस्तांना मिळत नाहीत . यामुळे विविध मागण्यांसंदर्भात  काही दिवसांपासून उपोषणं सुरु केले होते. या उपोषणाची दखल आमदार बाळू धानोरकर यांनी घेत प्रशासन सोबत , जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या सोबत प्रकल्प ग्रस्तांची नुकतीच बैठक घेतली. 

पाटबंधारे कार्यालय गुंडाळले 

निमढेला धरणाच्या पाटबंधारे कार्यालयाची  विभागणी  केली ते पाटबंधारे विभागाचे एक कार्यालय मूल मध्ये होते. कालांतराने तेही बंद झाल्याने निमढेला प्रकल्पगस्तांचा दस्तऐवज मिळणे दुरापास्त झाले होते. या करीता  आमदार धानोरकर यांनी पुढाकार घेत बहुतांश दस्तऐवज उपलब्ध करून दिले .
 

आमदार  धानोरकर व उपविभागीय अधिकारी पाहणी करणार 

निमढेला वासियांना कोणत्या अडचणी आहेत  व मूलभूत सुविधांची पाहणी आमदार  धाणोरकर व वरोराचे  उपविभागीय अधिकारी  प्रमोद भुसारी संयुक्तरित्या करणार असून त्या सुविधा पुरविल्या जाणार आहे . निमढेला गाव चिमूर तालुक्यातील खपगाव ग्रामपंचायतीला जोडण्यात आले आहे. त्यामुळे निमढेला गाव वरोरा तालुक्यातील नजिकच्या ग्रामपंचायतीला जोडणार असून ते शक्य नसल्यास निमढेला गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत दिली जाणार असल्याची चर्चाही बैठकीमध्येयें करण्यात आली.

 प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र मिळणार

 निमढेला प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी प्रकल्पात जाऊन अद्यापही प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यांनी आपले  दस्तऐवज पुनवर्सन अधिकारी यांच्याकडे देऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळण्याचा  मार्ग बैठकीत सुकर झाला. यासोबतच प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शासनाच्या नियमानुसार नौकरीही देण्याचे बैठकीमध्ये ठरविण्यात आले. जिथे जागा उपलब्ध आहे. तिथे शासन शेतजमीन देण्याचे मान्य करीत घराकरिता जागाही उपलब्ध करून देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.  यावेळी आमदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या सोबत निमढेला येथील सुनील घोडमारे, भीमा हनवते, तुकाराम चौखे, रमेश गोरवे, नारायण घोडमारे, प्रभाकर  बोरकर, किशोर हनवते, रुखवत हनवते, माधव चौधरी, नाना चौधरी, तात्या चौधरी, प्रकाश सोनवणे, शेख पठाण ,सोमा पुसनाके आदी उपस्थित होते.      Print


News - Chandrapur | Posted : 2017-09-17
Related Photos