अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या २४ ट्रकसह २ जेसीबी मशीन जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / चंद्रपूर :
 महाराष्ट्राचे अर्थमंत्री वनमंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्या निवडणूक क्षेत्रात १२ सप्टेंबर च्या मध्यरात्री  उप विभागीय पोलिस  अधिकारी बजरंग देसाई यांनी स्थानिक गुन्हे शाखा  पथकासह धाड टाकून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या २४ ट्रंकसह २ जेसीबी मशीन पकडून महाराष्ट्र सरकारचा महसूल चोरी करणाऱ्या वाळू तस्करांना चांगला धडा शिकविला आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील मुल तालुक्यात सर्वाधिक वाळु घाट असून या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या वाळु साठा रात्रीचा वेळेवर उपासा करून तेलगांना आणि आंध्रप्रदेश मध्ये तस्करी केली जाते . ही वाळु कोसंबी वाळु घाटातून तेलगांना आणि आंध्रप्रदेश मध्ये नेण्यासाठी या तस्करांकडे कोणताही परवाना नसल्याचे  पुरावे वाळु वाहन चालकांकडे नसल्यामुळे या वाळु तस्करांवर प्रशासन कोणती कार्यवाही करणार कि स्थानिक राजकीय पुढाकारी च्या दबावापोटी या वाळु तस्करांवर नाम मात्र कार्यवाही करून सोडून दिले जाणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष  लागले  आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2017-09-13
Related Photos