गावकऱ्यांच्या पुढाकाराने वायगावचे शेतशिवार झाले पाणीदार !


- आठशे हेक्टर क्षेत्रावर उपचार : २० कोटी लिटर पाण्याचे संवर्धन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / समूद्रपूर :
 समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) गावाच्या आठशे हेक्टर विस्तीर्ण शेतजमिन,नाले ओढ्यांवर जलयुक्त शिवार अभियान कामाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपचार पद्धतीचा अवलंब केल्याने तब्बल २० कोटी जल संवर्धन झाले. यामुळे शंभराहून अधिक हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आल्याने शेतकरी सुखावला आहे.
शिवाय शेतशिवारातील विहारीच्या पाण्याचे स्त्रोत वाढल्याने या  कामाची पाहणी आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार,जिल्हाधिकारी,मुख्य कार्यपालन अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी,आत्मा संस्थेचे विभागीय  संचालक,जिल्हा कृषी अधिकारी,तहसीलदार यांनी केली.
जलयुक्त शिवार अभियानचे स्थानिक पातळीवर उत्कृष्ठ संचालन करणारे कृषी सहाय्यक मनोज गायधने यांची प्रसंशा केली आहे.तर नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने या कामाला गती मिळाली असल्याची प्रतिक्रिया तालुका कृषी अधिकारी संजय हाडके यांनी व्यक्त केली.
सन २०१६ - १७ या वर्षी जलयुक्त शिवार अभियानात वायगाव (हळद्या) गावाची निवड करण्यात आली. गावाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या चार नाल्यापैकी दोन नाल्यावर सिमेंट बंधारे दुरुस्ती आणि २ .३० किलोमीटर खोलीकरण करण्यात आले. या नाल्यात पूर्वी गाळ साचल्याने आणि बेशरमची झुडपे वाढल्याने नाल्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरत होते.यामुळे तब्बल २५ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत होते. याबाबत कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यावर जलयुक्त शिवार योजनेत गावाचा समावेश करण्यात आला .
 या नाल्यावरील अकरा  बंधाऱ्याची दुरुस्ती  करून नाला खोलीकरण आणि गाळाचा उपसा केल्याने पावसाळ्यांत तब्बल २०० टीसीएम अर्थात २० लाख लिटर जलसाठा संवर्धित झाला आहे. यामुळे परिसरातील ३२ विहरीला पाण्याची पातळी एक मीटरने वाढली आहेत.तर नाल्यावर बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडल्याने तब्बल ३० ते ३५ शेतकऱ्यांना ओलीत करायला मिळत आहे. तर जवळपास शंभर एकर क्षेत्र सिंचनाखाली आले.
 मागेल त्याला शेततळे या संकल्पनेतून १३ शेतकऱ्यांच्या शेतात तळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.तर ७०० हेक्टर शेतजमिनीवर धाळीची बांध बंधीस्ती करण्यात आली आहे.या गावातील नाल्यावर आणखी आठ सिमेंट बंधाऱ्यांचे काम प्रस्तापित असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावाला पाणीदार बनविण्याकरिता कृषी सहाय्यक मनोज गायधने, सरपंच छाया गेडाम,ग्रामसेवक जयंत ठाकरे,प्रभाकर घुमडे,उत्तम घुमडे,विठ्ठल करवटकर, ज्योती पाटील , रेखाताई जांगळेकर आशीष  पाटील,प्रीतम धुमडे,सुनील हिवसे,महेश घुमडे,सचिन अनकर,महेंद्र पाटील,संदीप घुमडे,योगीराज वैद्य ,संदीप भोले  आदी गावकरी शिलेदार आहे.  Print


News - Wardha | Posted : 2017-09-12
Related Photos