कारंजा तालुक्यात वीज कोसळून दोन शेतकरी गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
 जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात आज दुपारच्या सुमारास जोरदार पावसासह वीजेच्या कडकडाट होवून वीज कोसळल्याने दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दोघांनाही नागपूर येथील  रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 
हेटी कुंडी येथील शेतकरी हेमंत दिपक बिजवार   (२७) हा त्याच्या शेतात आज दुपारच्या सुमारास फवारणी करीत असतांना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला.  पावसासह वीजेचाही कडकडात झाला व वीज जमीनीवर कोसळल्याने हेमंत बिजवार गंभीर जखमी झाला. तसेच त्याच परिसरात असलेल्या पालोरा येथील शेतकरी नागोराव किनकर  (६५) हा शेतात काम करत असतांना वीज कोसळल्याने हा सुध्दा गंभीर जखमी झाला. या दोघांनाही परिसरातील शेतकऱ्यांनी  लगेच उपचारासाठी नागपूर येथील रूग्णालयात भरती केले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. आज झालेला पाऊस जवळ पास दीड तास सुरू असल्याने शेतात काम करणाऱ्या  मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.   Print


News - Wardha | Posted : 2017-09-11
Related Photos