देवळी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाची गळफास घेवून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी/ वर्धा :
जिल्ह्यातील देवळी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सुधीर वैकुंठराव उईके (४०) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार सुधीर उईके यांनी मागिल ९ महिन्यांपासून वैद्यकीय रजा घेतली होती. उद्या ११ सप्टेंबर रोजी ते कर्तव्यावर हजर होणार होते. मात्र अचानक सुदामपुरी स्थित घरी गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे सुधीर उईके यांचे वडील  पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले तर त्यांचा भाऊ शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. सुधीर उईके यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.

   Print


News - Wardha | Posted : 2017-09-10
Related Photos